प्रत्येक नात्याला नाव दिलेच पाहिजे असे नाही
काही नाती असू द्यावीत निनावी
नाव आलं म्हणजे त्याला बंधनं आली
अपेक्षांच्या , स्पर्शाच्या , शब्दांच्या भिंती आल्या
शरीराचे, विचारांचे उंबरे आले
हिरव्याकंच वनराई मध्ये पडलेल्या कोवळ्या उन्हाप्रमाणे त्याने दिसावे
कधी त्याने फुलपाखरू होऊन हृदयरूपी फुलांवर स्वैर बागडावे
तर कधी झाडावरचे पान होऊन स्वेच्छेने अलगद जमिनीवर पडावे …
अशा वेळी आपण काहीच करू नये
फक्त बघत राहावं …अत्यंत कौतुकाने
तरळू द्यावं डोळ्यात पाणी … अतिशय आनंदाने
अशा वेळी शब्दांची जुळवाजुळव करूच नये मुळी …
डोळे बंद करून फक्त श्वासोच्छ्वास जमवावा
त्याचा सुगंध आपल्या श्वासा श्वासा त भिनू द्यावा
जन्म सार्थकी लागला असे समजावे
फक्त एक नाते निनावी असू द्यावे
--भालचंद्र

No comments:
Post a Comment