Monday, 19 September 2011

रविवार सकाळ

      रविवारची सकाळ ,साडे सात -आठ ची वेळ .बाल्कनितुन येणार कोवळ उन आणि हवेत जाणवणारा मंद गारवा अंगावर घेत,रेडियो वर लागेलेले पंडित भीमसेन जोशींचे भक्तिसंगीत एइकत चेहरयवर मंद हास्य घेऊन उभा असलेला मी. हातामाधल्या पोह्याच्या प्लेट मधून येणार्‍या गरम वाफा, चोहीकडून कानावर पडणारा पक्ष्यांचा कार्णमधुर  आवाज, स्वयंपाकघरातून येणारा वाफळ्त्या चहाचा मस्त वास ,आणि पूर्वेकडून हळूहळू वर येणारा माझा " मित्र " -अत्यंत तेजस्वी,प्रसन्न...  आम्ही दोघेही बराच वेळ एकमेकांकडे एकटक बघत राहतो ,शेवटी वैतागून तोच मला म्हणतो छ्या .....स्साला तूच जास्त नशिबवान आहेस...मी शांतपणे हसून त्याला नमस्कार करतो आणि मग आत येऊन खुर्चिवर डोळे मिटून बसतो पंडित भीमसेन जोशिना एइकत.....शांतपणे

                                                                                             ---- भालचंद्र भुतकर

No comments:

Post a Comment