Tuesday, 16 April 2013

मागेच उडाले होते


घरट्यासाठी परक्यांच्या आयुष्य वेचले ज्याने
घरट्यातील तयाच्या पक्षी उदास होते

कवड्या उदरतेच्या माझ्यावर उधळल्या त्याने
माझ्याकडेच ज्याचे सारे उधार होते

बहरोनि मग त्याने आकाश चुंबिले जेव्हा
मानकरी यशाचे खालीच राहीले होते

हा कोणत्या युगाचा दाविलास मज चेहरा
सारीच श्वापदे अन् माणूस कोण नव्हते

चित्र हे उद्याचे जरी आज काढतो मी
रंग तयातील आवडते मागेच उडाले होते

                                  -- भालचंद्र भुतकर


4 comments:

  1. One Of the great feeling you expressed in very simple words....I Like
    बहरोनि मग त्याने आकाश चुंबिले जेव्हा
    मानकरी यशाचे खालीच राहीले होते
    this tranza ...very much
    How deep though inside this....

    ReplyDelete
  2. Nice one.. loved 3rd stanza..

    You wrote this ? :P

    ReplyDelete
  3. Ho Priyanka ...mich lihil ahe :)

    ReplyDelete