घरट्यासाठी परक्यांच्या आयुष्य वेचले ज्याने
घरट्यातील तयाच्या पक्षी उदास होते
कवड्या उदरतेच्या माझ्यावर उधळल्या त्याने
माझ्याकडेच ज्याचे सारे उधार होते
बहरोनि मग त्याने आकाश चुंबिले जेव्हा
मानकरी यशाचे खालीच राहीले होते
हा कोणत्या युगाचा दाविलास मज चेहरा
सारीच श्वापदे अन् माणूस कोण नव्हते
चित्र हे उद्याचे जरी आज काढतो मी
रंग तयातील आवडते मागेच उडाले होते
-- भालचंद्र भुतकर
One Of the great feeling you expressed in very simple words....I Like
ReplyDeleteबहरोनि मग त्याने आकाश चुंबिले जेव्हा
मानकरी यशाचे खालीच राहीले होते
this tranza ...very much
How deep though inside this....
Wa wa
ReplyDeleteNice one.. loved 3rd stanza..
ReplyDeleteYou wrote this ? :P
Ho Priyanka ...mich lihil ahe :)
ReplyDelete