आभाळातल्या चंद्राला मी कधी पौर्णिमे साठी झुरताना पाहिलं नाही , अर्ध्या चंद्र कोरीत सुद्धा तो परिपूर्ण असतो . अमावास्येच्या रात्री आभाळाचा निरोप घेऊन निघून जाताना सुद्धा त्याला कधी दु : ख होत नाही आणि दुसर्या दिवशी परत येण्याची घाई पण कधी असत नाही . पहिल्या दिवशी तो जितका स्थितप्रद्न्य आणि निश्चल असतो तितकाच तो शेवटपर्यंत असतो आणि यापुढेही असेल याची मला खात्री आहे .
पूर्णत्वाचा गर्व नाही , अपूर्णतेचे दु: ख नाही , आणि अस्तित्वाची चिंता नाही . आहे तो फक्त प्रवास - अखंड आणि अविरत . या प्रवासाला सुरुवातही नाही अन शेवटही नाही … म्हणूनच तो सुंदर आहे , शांत आहे , परिपूर्ण आहे .
-- भालचंद्र

No comments:
Post a Comment