" नावीन्य
हवे असणे " हा
माणसाच्या स्वभावाचा एक अविभाज्य
पैलू आहे. प्रत्येक
गोष्टीत नाविण्याची ओढ ही
माणसाच्या जिवंतपणाचा पुरावा असते.
कोणतीही नवीन गोष्ट
जेव्हा आपल्या आयुष्यात घडते
किंवा एखादी नवीन
व्यक्ती आपल्या आयुष्यात येते,
तेंव्हा होणारा आनंद, उत्साह
हा अमर्याद असतो.
आपल्या भाषेत एक म्हण
आहे "नव्याचे नऊ दिवस
" अर्थात नवीन घटनेचे
, गोष्टीचे , व्यक्तीचे कौतुक ती
नवीन असेपर्यंतच असते,
नंतर मात्र तिच्याकडे
नजर देखील वळेनसि
होते.
विद्यार्थी
दशेत असताना दरवर्षी
पुढील इयत्तेत गेल्यानंतर, नवीन
पुस्तके, नवीन वह्या,
नवीन छत्री, नवे
शिक्षक, नवे विषय
आणि आयुष्यातील एक
नवे पाऊल या गोष्टी भरपूर
अभ्यास करण्याचा संकल्प करण्यासाठी
पुरेशा असतात. आपण सुद्धा
खूप मनापासून ठरवतो
की यावर्षी पहिल्यापासूनच
भरपूर अभ्यास करायचा,
रोजच्या रोज गृहपाठ
करायचा आणि शाळेत
पहिला नंबर पटकवायचा.
तो निर्धार अतिशय
निर्मळ, शुद्ध आणि स्वच्छ
मनाने केलेला निर्धार असतो, त्याच्यात
कुठेही खोटेपणा नसतो, वाईट
हेतू नसतो , अतिशय
प्रामाणिकपणे घेतलेला आपला तो
निर्णय असतो. घेतलेल्या
निर्णायानुसार अपा वागायला
सुरूवात देखील करतो, पहिल्या
दिवसापासूनच अतिशय सभ्य , हुशार
,शांत आणि सुस्वभावी
होण्याचा मनापासून प्रयत्न आपण
करतो आणि
तो यशस्वी देखील
होतो. पण जसे
जसे दिवस पुढे
सरकत जातात, इयत्ता
जुनी होत जाते,
वह्या, पुस्तके, शिक्षक, विषय
सवयीचे होत जातात, तसे तसे
आपल्यातले धांदरट, खोडकर, दंगेखोर
मूल बाहेर येऊ
लागते , वह्यांच्या प्रारंभी च्या
पानांवराती असलेले हस्ताक्षर आणि
शेवटच्या पानांवराती असलेले हस्ताक्षर
यांच्यात कमालीची तफावत दिसू
लागते, हे हस्तलिखित
एकाच माणसाचे आहे
असे देखील छाती
ठोक पणे कोणी सांगू
शकणार नाही अशी
परिस्थिती निर्माण होते. बघता
बघता वर्ष संपून
जातं, परीक्षा येतात
आणि निघून जातात,
मग निकालाचा दिवस
उजडतो , त्या दिवशी
आपला खरोखर निकाल
लागतो आणि मग मन निराश होतं, हताश होतं
, स्वत:वरच चिडत, आणि वर्षभर केलेल्या चुकांचा पाढा एका क्षणात आपल्याला आठवतो.
मग असेच निराशवस्थेत काही दिवस निघून जातात , थोडं
दु:ख हलकं होतं , आणि मग खचलेलं मन पुन्हा एकदा उचल खातं, कारण पुन्हा एकदा हातात आलेली
असतात नवीन पुस्तकं, नवीन वह्या, नवीन विषय आणि नवीन शिक्षक , पुन्हा एकदा नव्याने
आलेला असतो नवीन पावसाळा , मातीचा ओला सुगंध देखील गेल्यावर्षीपेक्षा अधिकच चांगला
येतोय असं वाटू लागतं, नव्याने हिरव्यागार झालेल्या झाडांच्या पानफुलांमधे सगळी निराशा
कुठल्या कुठे गायब होऊन जाते तेच काळात नाही . येणार्या दिवसांच्या उंबरठ्यावर नव्या
ध्येयाची नवी स्वप्ने आपोआप पडू लागतात , रोजचेच सूर्यकिरण नवे
भासु लागतात आणि
हे येणारं वर्ष
...या वर्षी आपण
नक्कीच गेल्या वर्षीपेक्षा चांगलं करून
दाखवू अशी खात्री
आपली आपल्यालाच पटते.
एकदा का ही
खात्री पटली की
मग पुढचं सगळं
सोप्पं होऊन जातं.
या
वर्षी देखील शाळेत
आपला पहिला नंबर
येत नाही , धांदरटपणा
, खट्याळपणा, दंगेखोरपणा पूर्णपणे बंद
होत नाही, या
वर्षी ही निकालच्या
दिवशी आपला निकालच
लागलेला असतो , पण मागच्या वर्षीपेक्षा तो
नक्कीच चांगला असतो .
हीच तर माणसाच्या
मेंदूची कमाल आहे , आपण शाळेमध्ये
इतर विषय तर
शिकतोच पण त्याहीपेक्षा
आपण शाळेत आयुष्य
जगणं शिकतो , चुकांमधून
शिकणे यालाच आयुष्य म्हणतात . जुन्या
चुका नव्याने न
करता नवीन चुका
करून पुढच्या वेळी
त्या चुका सुधारणे
हे ज्याचे ध्येय
असते तो खरं
आयुष्य जगत असतो , कधी ही
न चुकणारा माणूस
हा मृत अवस्थेप्रमाणेच
असतो.
म्हणूनच
नव्या गोष्टींचे स्वागत
कोणी कसे करावे
हा ज्याचा त्याचा
प्रश्न असतो , आपण सगळेच
आरंभशूर असतो. नवीन गोष्ट
आपण सगळेच आनंदाने
, काळजीपूर्वक आणि उत्साहाने
करत असतो , ती
जुनी झाल्यानंतर आपण
कसे वागतो यावर
आपले यशापयश अवलंबुन
असते. म्हणून नावीण्यावर
भुराळून न जाता
स्वत:च्या कर्त्वव्यवर
लक्ष केंद्रित करून
प्रत्येक दिवस नव्याने
जगावा ,
संदीप खरे च्या
कवितेतील चार ओळी
मला खूप आवडतात
:
स्वत:ला विकून
काय घेशिल विकत?
खरी खरी सुखे
राजा मिळती फुकट!
हपापून बाजारात मागशील किती?
स्वत:तच नवे
काही शोधायला हवे!....
कधीतरी वेड्यागात वागायला हवे
कधीतरी वेड्यागात वागायला
हवे
असेच स्वत: तच नवे
काहीतरी शोधण्याचा या नवीन
वर्षी
माझा संकल्प आहे...
हे नवीन
वर्ष तुम्हा सर्वाना
आनंदाचे सुखा समाधानाचे
आणि भरभराटीचे जाओ
हीच प्रार्थना... नवीन
वर्षाच्या तुम्हा सर्वाना हार्दिक
शुभेच्छा
---भालचंद्र
No comments:
Post a Comment