असे जीवनाचे ऋतू फार आले
पुन्हा आसवांचे हसे फार झाले
तसा सावराया मला मीच होतो
जरी जीवघेणे असे वार झाले
तुझ्या वेदनांचे ठसे व्यर्थ काही
तुझ्या यातनांचे मुके अर्थ काही
जगी वावराया , पुरे एवढेसे
तुझ्या सोबतीची मला आस नाही
कसे काय सांगू ,जपतो उराशी
कसे दु:ख माझ्या भिजते उशाशी
तरी बोललेलो , कितीदा तुला मी
नको खेळ खेळू असे काळजाशी
जरी वादळे ही सदोदीत देवा
कधी थांबलो ना तुझ्या पायरीला
नसे वाकण्याचे स्वभावात माझ्या
असे मोडलेला कणा सोबतीला
--भालचंद्र
पुन्हा आसवांचे हसे फार झाले
तसा सावराया मला मीच होतो
जरी जीवघेणे असे वार झाले
तुझ्या वेदनांचे ठसे व्यर्थ काही
तुझ्या यातनांचे मुके अर्थ काही
जगी वावराया , पुरे एवढेसे
तुझ्या सोबतीची मला आस नाही
कसे काय सांगू ,जपतो उराशी
कसे दु:ख माझ्या भिजते उशाशी
तरी बोललेलो , कितीदा तुला मी
नको खेळ खेळू असे काळजाशी
जरी वादळे ही सदोदीत देवा
कधी थांबलो ना तुझ्या पायरीला
नसे वाकण्याचे स्वभावात माझ्या
असे मोडलेला कणा सोबतीला
--भालचंद्र
झकास शेवटचं कडवं...
ReplyDelete