Monday, 3 June 2013

आला पाऊस गेला पाऊस


आला पाऊस गेला पाऊस
माझ्याकरिता माझ्यासोबत
चिंब एकदा भिजला पाऊस

आज अंत हा पाहून गेला
उगा चौकशी करून गेला
दोन क्षणांची चुकली गणिते
पाठ पुन्हा ही फिरवून गेला
मला पावसा घाल अन्हिके

तुझे पोर हे असे लाडके
तुझीच माया तुझीच दुनिया
तुझेच सारे तुझेच खेळ
अंबरातुनी तुझ्याच त्याही
माझ्यासाठी हसला पाऊस

आला पाऊस गेला पाऊस  ....

एकांती तव पैंजणा चे
भास होता क्षणोक्षणी
नकळत कानी गुंजन करिती
पुन्हा नव्याने जुनीच गाणी
नको सखी हा विरह आताशा
अंतरातुनी ओसांडून बघ
नसांनसांतून भिनला पाऊस

आला पाऊस गेला पाऊस
उनाड अल्लड लेकरापरी
ढगात पुन्हा दडला पाऊस

माझ्याकरिता माझ्यासोबत
चिंब एकदा भिजला पाऊस ...

                      --  भालचंद्र

Wednesday, 17 April 2013

वेध मनाचे: एक पत्र पावसाला

वेध मनाचे: एक पत्र पावसाला: प्रिय पावसा ,       बाबा रे , तुला काही लाज वगैरे वाटते की नाही ? किती दिवस झाले फिरकलाच नाहीस इकडे अजिबात. परवा माझी ४ वर्षाची भाची गाणे...

Tuesday, 16 April 2013

एक पत्र पावसाला


प्रिय पावसा ,
      बाबा रे , तुला काही लाज वगैरे वाटते की नाही ? किती दिवस झाले फिरकलाच नाहीस इकडे अजिबात. परवा माझी ४ वर्षाची भाची गाणे म्हणत होती " सांग सांग भोलानाथ , पाऊस पडेल काय ? " तेव्हाच तुझी आठवण आली. म्हटलं आज तुला पत्रच लिहून  विचारावं , कधी येण्याचा विचार आहे साहेबांचा ?

         महाराष्ट्रात दुष्काळ पडलाय तुला माहिती आहेच , पण मला त्याबद्दल नाही बोलायचं तुझ्याशी आज. महाराष्ट्रातल्या दुष्काळपेक्षा सुद्धा  खूप मोठा दुष्काळ पडलाय माझ्या मनात. खूप दिवस झाले रे हसता हसता रडून आणि रडता रडता हसून. पूर्वी हृदयाच्या कप्प्या कप्प्यातून आनंद- दुक्खा चे झरे वाहायचे गोड-खारट पाण्याचे... आता ते ही अगदी आटले  आहेत.  बाकी माझं अगदी उत्तम चालू आहे असं लोकं म्हणतात. माझ्याप्रमाणेच  ते ही  मनाने दुष्काळग्रस्त असावेत. माझ्या कोरड्या हसण्याला फसतात  ते सगळे. तसे हल्ली सगळेजण दुष्काळग्रस्तच भेटतात मला. कोणी हंगामी तर कोणी बारमाही. रोज उठून तेच दुष्काळी चेहरे बघायचा कंटाळा आलाय बघ . मध्यंतरी सरकारने खोटा खोटा पाऊस पाडायचा प्रयत्न केला तेव्हा थोडा आसावलो होतो मी. म्हटलं पाऊस पाडायला नाही जमलं तर निदान ढग तरी दाटून आणा थोडेसे. तेवढाच थोडासा रडून मोकळा झालो असतो मी. पण तो ही प्रयोग फसला नेहमीप्रमाणे. म्हणून मग आता म्हटलं डाइरेक्टच विचारावं तुला.
         खूप जुना आणि सगळ्यात जवळचा मित्र एकटाच आहेस रे तू माझा . मागच्या पावसाळयापासून साचलेलं सगळं सांगायचं आहे तुला. खूप गोष्टी तुझ्याशी शेअर  करायच्या आहेत ज्या मी फक्त आणि फक्त तुलाच सांगू शकतो. तुला घट्ट मिठी मारुन कडकडून भेटायचंय मला. तू आलास की किती मस्त हुन्दडतो ना आपण सगळीकडे. तू म्हणशील तिथे म्हणशील तितका वेळ भटकत असतो मी तुझ्यासोबत. मागच्या वर्षी " राहिलेली मजा पुढच्या वर्षी " असं सांगून गेलास तीच राहिलेली मजा आता मला करायची आहे.
       आणि आलास ना या वेळी की नुसतं थेयिमान घाल. कोणाचंही काहीही एइकू नकोस. तुला माहितीये मी फक्त बाहेरून भिजत नाही. आतून , अगदी आतून प्रत्येक कप्पा न कप्पा चिंब झाल्याशिवाय मला तू आल्यासारखं वाटत नाही. तू भिजवलेल्या मातीचा गंध नसानसांतून भिनवल्याशिवाय मला जिवंत असल्यासारखाच वाटत नाही. 
   असो... आणि हो ,एकटाच येऊ नकोस. येताना "तिची" आठवण पण घेऊन ये आठवणीने. या वर्षी थोडी कमी आण , पण आणच. काय आहे ना, शरीराचं कितीही वय वाढलं तरी मनाचं वय नाही रे वाढवता येत. थोडी हूरहुर पण घेऊन ये झालंच तर. तिच्या ओल्या हातांच्या स्पर्शाचा भास मात्र नको आणूस ...का ते तुला आल्यावर सांगेन मी .सगळ्याच गोष्टी अशा पत्रात लिहीणे बरोबर नाही.
      या वर्षी आलास की मी तुला लवकर मात्र जाऊ देणार नाही . पुढच्या वर्षी तू परत येईपर्यंत पुरेल एवढा ओलावा माझ्या हृदयाला आणि मनाला दे आणि मग जा खुशाल हवं तर . आणखी एक म्हणजे हे पत्र तुला मिळेल तेव्हा नेहमीसारख ओलं ओलं नाही लागणार हाताला . अरे दाटून खूप आलंय रे पत्र लिहिताना पण मी रडणार मात्र नाही या वेळी . तसं ठरवलच आहे मी. म्हटलं  तू आल्याशिवाय आता रडायचच नाही अजिबात. तू आल्यावरच काय असेल ते होऊन जाऊ दे तुझ्यासमोर . म्हणून रोखून  ठेवले आहेत अश्रू तुझ्यासाठी.
       बर आता जास्त काही एमोशनल लिहीत नाही. लवकर ये आता इकडे. आणि यायच्या आधी कळव नक्की मला . मागच्या वर्षी सारखा असा अचानक दारात येऊन उभा राहू नकोस . काही सुचत नाही रे तू असा एकदम आलास की . अगदी कावराबावरा  होउन जातो मी . मी तुला न्यायला येइन यंदा माझ्या नवीन बाइक वरुन .तिथेच आपल्या नेहमीच्या टेकडीवर . आई ला पण सांगून ठेवलंय मी तुझ्या आवडीची कांदा भजी करायला. आता जास्त वाट पाहायला लावू नकोस आणि ये बरं पटकन .

तुझा आणि फक्त तुझाच बारमाही पावसाळी मित्र. :)
भालचंद्र

मागेच उडाले होते


घरट्यासाठी परक्यांच्या आयुष्य वेचले ज्याने
घरट्यातील तयाच्या पक्षी उदास होते

कवड्या उदरतेच्या माझ्यावर उधळल्या त्याने
माझ्याकडेच ज्याचे सारे उधार होते

बहरोनि मग त्याने आकाश चुंबिले जेव्हा
मानकरी यशाचे खालीच राहीले होते

हा कोणत्या युगाचा दाविलास मज चेहरा
सारीच श्वापदे अन् माणूस कोण नव्हते

चित्र हे उद्याचे जरी आज काढतो मी
रंग तयातील आवडते मागेच उडाले होते

                                  -- भालचंद्र भुतकर


Saturday, 16 February 2013

डायरी

माझी एक डायरी मला खूप खूप आवडायची......
आक्ख्या जगात एक तीच तर होती
जी माझं सगळं शांतपणे एइकून घ्यायची
मी कसाही वागलो किती ही वैतागलो
तरी रोज रात्री अलगद माझ्या हाताखाली यायची

सगळ्यांपासून लपवून
एक मोरपीस मी तिला दिलं होतं सांभाळायला
खूप समजूतदार होती ती
कधी अत्यानंदाचे क्षण मला मिठीत घेऊन तिने स्वतःत उतरवले होते
तर कधी मला शब्द देऊन तिने दुक्खाना सावरले होते
माझे सगळे हिशोब वगैरे पण तीच बघायची
थोडी ताटातूट चालायचीच
पण ती ही निमूटपणे सगळं पाहायची
माझी एक डायरी मला खूप खूप आवडायची......

बोलली नाही ती कधी मला
पण लपून छपून ती ही माझ्यावर प्रेम करायची
स्वतःच्या आयुष्यातील काही पाने तिने मुद्दाम कोरी ठेवली होती
माझ्यासाठी...
मी ही मग त्यावर कधी हिशोब मांडायचो नाही
अशी सगळी गंमत चालायची
माझी एक डायरी मला खूप खूप आवडायची......

कधी कधी मला खूप भरून यायचं
अगदी आतून आतून तुटायचं
खूप एकट एकट वाटायचं
तेव्हा ही असायचीच सोबत
अगदी पहाडासारखी खंबीर माझ्या बाजूला
माझ्या डोळ्यातल्या सरीना तिनेच तर आंगण दिले होते
मुक्तपणे बरसायला
अश्रूनी पुसल्या गेलेल्या माझ्याच शब्दांचे अर्थ
मलाच कानात येऊन सांगायची
माझी एक डायरी मला खूप खूप आवडायची......

एकदा रात्री मी नशेत असताना
मला ती सोडून गेली
माझे मोर पीस मात्र आठवणीने देऊन गेली
सालाबाद प्रमाणे मी ही तिला विसरून गेलो
नव्या संकल्पांच्या जोशात तिला कुठेतरी सोडून आलो

परवा घर आवरताना अचानक
पोटमाळ्यावर मला ती दिसली
माझ्याप्रमाणे ती ही आता म्हातारी झाली होती
पण तरी ही अगदी अगदी ओळखीचं हसली
मी तिला हातात घेतलं
माझ्या पाणावलेल्या डोळ्या ईतकेच
तिचे काठ पण थोडेसे ओलावले होते
एवढी वर्षं निघून गेली पण तरीही
तिची सवय गेली नव्हती
माझ्या मनातलं किती अचूक ती ओळखायची
माझी एक डायरी मला खूप खूप आवडायची......
                                     
                                                --  भालचंद्र भुतकर

Saturday, 26 January 2013

एक साथ


तुझे पाने की मन्नत
और जमाने का डर
आजकल एक साथ ही आते है

आए तो थे कई बार
तुझे अपने दिल का हाल बताने
तेरे ज़ुल्फो की शाखो मे लिपटे
अपने घायल दिल को छुड़ाने
मगर क्या बताए जानेमन
तेरा दिल जीतने की मेरी आरजू
और मुझे हराने की तेरी ज़िद
आजकल एक साथ ही आते है

वो झुकी पलकों के अफ़साने
वो होटो की नज़ाकत
वो गालों पे दमकती हुई हसीं
और आँखों की शरारत
बचना तो लाख चाहा था हमने
इन कातिल अदाओंसे
मगर क्या बताए जानेमन
नज़रोंसे घायल करने की तेरी शिद्दत
और उसपे मर मिटने की हमारी हरकत
आजकल एक साथ ही आते है

कभी हमने भी सोचा था
सब छोड़ कर कहीं दूर चले जाएँ
तेरी गलियों से निकलकर
अपनी गलियों मे लौट आए
मगर क्या बताए जानेमन
शराब छोड़ने की हमारी चाहत
और आँखों से पिलाने की तेरी आदत
आजकल एक साथ ही आते है

-- भालचंद्र भुतकर






Thursday, 22 December 2011

सोचा था तेरे जाने के बाद...


सोचा था तेरे जाने के बाद
नज़ाने कितनी राते यादों मे बीत जाएँगी
कम्बख़्त पहली ही रात
चैन की नींद आयी

नज़ाने कितने ख्वाब देखे थे
मैने अपनी जुदाई के
हर ख्वाब मे तेरी याद थी और हर याद मे गम
टूटा हुआ दिल और तनहा राते
कैसे सह पाएँगे हम
नज़ाने क्यूँ मगर
एक अजीब सी खुशी छाई है
तेरे जाने के बाद
हर लमहे की हँसी लौट आयी है
अब ना टूटा हुआ दिल है और ना रातों मे तनहाई
कम्बख़्त पहली ही रात चैन की नींद आयी

सोचा था तेरे जाने के बाद
हर शक्स अजनबी होगा
मयखाने मे गुज़रेगी हर श्याम
और हर गम रूबरू होगा
नज़ाने क्यूँ मगर
मे मस्ती मे झूम रहा हूँ
तेरे जाने की खुशी मे
दिन रात पी रहा हूँ
अब ना तू है ना तेरे जाने का गम
और ना दुखों की गहराई
कम्बख़्त पहली ही रात चैन की नींद आयी

सोचा था तेरे जाने के बाद
किसी मोड़ पर अचानक
फिरसे मुलाकात होगी
" मैने तुम्हे पहले भी कहीं देखा है "
यही कहोगी तुम
और उसी मोडपर मेरी कयामत होगी
नज़ाने क्यूँ मगर
इन बाहों को अब तेरा इंतेज़ार नहीं है
मुलाकात होगी तो शायद तुम्हे पहचान लेंगे
इतना भी अब यकीन नही है
ज़रा गौर से सुन ए बेवफा
तू नही तो और सही , और नही तो कोई और सही
कम्बख़्त पहली ही रात चैन की नींद आयी

-- भालचंद्र भुतकर